Author Topic: नको मला सोबत तुझी...!!  (Read 1219 times)

नको मला सोबत तुझी...!!
« on: January 06, 2014, 09:53:25 PM »
नको मला सोबत तुझी,
जी मला,
रडवणार आहे.....
******************
नको मला तुझे ते फुल,
जे माझ्या,
देहावर वाहणार आहे.....
******************
नको मला तुझे ते अश्रू,
जे तू माझ्यासाठी,
गाळणार आहे.....
******************
नको मला प्रेमाचे कटू बोल तुझे,
जे मला नेहमी,
काट्यासारखे टोचणार आहे.....
******************
नको मला तुझा तो फसवा जिव्हाळा,
जो मला जिवंतपणी,
दररोज मारणार आहे.....
******************
दररोज मारणार आहे.....
:'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०६-०१-२०१४...
रात्री ०९,४५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता