Author Topic: व्यथा तिच्या माझ्या मनाची...!!  (Read 1127 times)

व्यथा तिच्या माझ्या मनाची...!!
* * * * * * * * * * * *
रोज मी तुला रडून,
खुप आठवत होतो,
आज तु माझी खुप,
आठवण काढत आहे.....
* * * * * * * * * * * *
रोज मी एक एकटा,
असून हसत असतो,
आज तु मात्र एकटीच,
माझ्यासाठी रडत आहे.....
* * * * * * * * * * * *
रोज मी तुझ्यासाठी,
खुप झूरत होतो,
आज मी नसण्याचं,
दुःख तुला बोचत आहे.....
* * * * * * * * * * * *
रोज मी तु दिलेल्या,
जख्मा लपवून खुश होतो,
आज तु मात्र माझ्यासाठी,
मनापासून तडफडत आहे.....
* * * * * * * * * * * *
रोज मी तुला एकदा,
भेटायला तरसत होतो,
आज तु वेडीपिशी होऊन,
मला ईकडे तिकडे शोधत आहे.....
* * * * * * * * * * * *
रोज मी तुला डोळे मिटून,
स्वप्नात बघत होतो,
आज तु तुझेच स्वप्न तोडून,
माझे स्वप्न पाहत आहे.....
* * * * * * * * * * * *
रोज मी तुला भासवून,
स्वतःशीच गप्पा मारत होतो,
आज तु अबोल राहून,
मला परखं करत आहे.....
* * * * * * * * * * * *
मला परखं करत आहे.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०७-१२-२०१४...
रात्री ०९,४९...
© सुरेश सोनावणे.....