Author Topic: फक्त आठवणी...!!  (Read 1805 times)

फक्त आठवणी...!!
« on: January 17, 2014, 06:19:52 PM »
नकळत कसे तुटले नाते,

विसरलास आपली ओळख जुनी.....

तु असा ही वागशील माझ्याशी,

अशी कल्पनाही नव्हती मनी.....

न सांगता तुझ्या जाण्याने,

झाली जिँन्दगी माझी सुनी.....

संपली स्वप्ने सारीच,

नाही राहीले माझे कुणी.....

तुझी आठवण येताच,

टचकन येते डोळ्यात पाणी.....

हरवले सर्वकाही माझे,

ऊरल्या त्या फक्त आठवणी.....

फक्त आठवणी...!!
:'(  :O  :'(  :O  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १७-०१-२०१४...
दुपारी ०५,५२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता