Author Topic: या प्रेमवेड्याला...!!  (Read 1297 times)

या प्रेमवेड्याला...!!
« on: February 05, 2014, 09:55:16 AM »
शोना कुठे शोधू गं मी तुला,
का सोडून गेलीस गं मला,
जेव्हा भेटशील ना गं तु मला,
तेव्हा सोडणारच नाही मी तुला.....

तुझी खुप आठवण येते गं मला,
कधी तरी तू ही आठव ना गं मला,
खुप समजावून थकलोय गं,
मी माझ्या या मुर्ख ह्रदयाला.....

आता तू कधीच भेटणार नाहीस,
हे कळून चूकलयं गं मला,
तरी पण तू परतून येण्याची,
एक वेडी आशा आहे गं मनाला.....

तू तर विसरली आहेस मला,
मी विसरुच शकत नाही गं तुला,
तू भेटली नाहीस जरी मला,
तरी मी नक्की भेटेन गं तुला.....

कारण ???

जसे मी वेड्यासारखा,
शोधतोय मी तुला,
तसेच तू ही शोधत,
असशील ना गं मला.....

शोना भेटलोच कधी जर,
आपण पुन्हा ऐकमेकाला,
तर माझा हात पकडून,
थांबवशील ना गं मला.....

सारे जुने वाद विवाद विसरुन,
i love u बोलशील ना गं मला,
तुझ्या घट्ट मिठीत कवटाळून,
समजुन घेशील ना गं या प्रेमवेड्याला.....

या प्रेमवेड्याला...!!

I Mïss Yöü Shönä...
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-०२-२०१४...
सकाळी ०९,४२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता