Author Topic: येईल अशी वेळ...!!  (Read 2594 times)

येईल अशी वेळ...!!
« on: February 16, 2014, 06:22:12 PM »
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधशील तू मला.....

पण ???

काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला.....

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास अतुरशील तु मला.....

पण ???

अथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला.....

येईल अशी वेळ,
स्पर्श करण्यास तरसशील तू मला.....

पण ???

विरहाच्या जाळ्यात फसलेली,
एकटी दिसेल मी तुला.....

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तू मला.....

पण ???

तुझे ओघळणारे अश्रूं पुसताना,
दिसणार नाही मी तुला.....

तुझ्याविणा जगावस वाटत नाही रे,
खुप एकटी समजतेय रे स्वतःला.....

कारण ???

तुझी खुप आठवण येते रे मला,
विसरु शकत नाही रे मी तुला.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १६-०२-२०१४...
दुपारी ०४,०२...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vilas khetle

  • Newbie
  • *
  • Posts: 7
Re: येईल अशी वेळ...!!
« Reply #1 on: March 18, 2014, 02:11:54 PM »
प्रिय सुरेश तुमचि कविता छान आहे.