Author Topic: निरोप तुझा घेताना...!!  (Read 1577 times)

निरोप तुझा घेताना...!!
« on: February 25, 2014, 09:31:27 PM »
निरोप तुझा घेताना,
पापणी माझी रडत होती.....

तू सोडून जाऊ नकोस म्हणुन,
नजर तुला मन भरुन पाहत होती.....

शेवटी नाही ऐकलेस तू माझे,
तुझ्या मनासारखंच तू करत होती.....

डोळ्यात अश्रूं असण्याचा आव आणून,
मनातल्या मनात तू हसत होती.....

मी मनात तुझ्या भरताना,
तू नजरेतून माझ्या उतरत होती.....

मी देवाकडे प्रार्थना करत असताना,
तू विराहाच जाळं रचत होती.....
 
खरच किती मतलबी आहेस तू,
तुझी नजर मला सांगत होती.....

मी तुझ्याशिवाय जगू कसे म्हणताना,
तू माझ्याकडे दूराव्याचे वचन मागत होती.....
:'(  :-(  :'(  :-(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २५-०२-२०१४...
रात्री ०९,२३...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


सीमा

  • Guest
Re: निरोप तुझा घेताना...!!
« Reply #1 on: March 01, 2014, 06:22:10 PM »
डोळ्यात अश्रूं असण्याचा आव आणून,
मनातल्या मनात तू हसत होती.....

---------------------------------------

आहेस तू डांबीस बिलंदर ढोंगी खोटारडी
वर्णाया तुज पडे माझी बुद्धी गे तोकडी
करत बसे तरी काव्ये माझी मी वेडीवाकडी;
नाही गणती भरली किती माझ्या कवितांनी पोतडी!