Author Topic: एक एकटा एकटाच मी...!!  (Read 1660 times)

एक एकटा एकटाच मी...!!
« on: March 21, 2014, 08:57:01 PM »
एक एकटा एकटाच मी,
कधी एकटा रडतो,
तर,
कधी लोक रडवतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी फसत जातो,
तर,
कधी लोक फसवतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी दुःखात असतो,
तर,
कधी लोक दुःख देतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी तुटला जातो,
तर,
कधी लोक तोडतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी दूर राहतो,
तर,
कधी लोक दूरवतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी रागात असतो,
तर,
कधी लोक रागवतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी ओरडत असतो,
तर,
कधी लोक ओरडतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी स्वप्नात रमतो,
तर,
कधी लोक स्वप्न भंगवतात.....

एक एकटा एकटाच मी,
कधी हसत असतो,
तर,
कधी लोक मर म्हणतात.....
:'(  :-(  :'(  :-(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २१-०३-२०१४...
दुपारी ०५,४१...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Shankar lohar

  • Guest
Re: एक एकटा एकटाच मी...!!
« Reply #1 on: March 21, 2014, 09:40:14 PM »
मनाला स्पर्श करुन गेले तुझे शब्द खरच जगात कुणी कुणाच नसतं...