Author Topic: तुझी आठवण...!!  (Read 2069 times)

तुझी आठवण...!!
« on: March 26, 2014, 10:07:36 PM »
तुझी आठवण...!!

अश्रूं ही संपलेत माझे,
तुझ्या आठवणीत रडून,
मलाच मी विसरलोय गं,
तुझी आठवण काढून.....

तुझ्याविना अधुराच राहीलो मी,
कोठून आणू मी तुला शोधून,
ना जाणलेस कधी मन माझे,
गेलीस ना शेवटी एकटं टाकून.....

सगळी वचने खोटीच दिली,
जिँकलीस ना तू मला हरवून,
शेवटी तोडलसं ना गं नातं,
गेलीस ना मला परखं करुन.....

कधी तरी समजशील मला,
माझ्या ख-या प्रेमाला,
एवढीच माफक अपेक्षा आहे,
शोना माझी तुझ्या कडून.....

सत्यात नाही भेटलीस,
तरी चालेल गं मला,
न चुकता रोज भेटत जा,
मला स्वप्नात येवून.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २६/०३/२०१४...
रात्री ०९,५७...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
Re: तुझी आठवण...!!
« Reply #1 on: July 11, 2015, 02:36:38 PM »
Mast Kavita ahe Suresh