Author Topic: एकांत!!  (Read 1429 times)

Offline Suresh Jambhalkar

 • Newbie
 • *
 • Posts: 4
एकांत!!
« on: March 31, 2014, 10:36:31 AM »
एकांत…।
ज्याला हवाय त्याला न मिळणारा, आणि  ज्याला नकोय  त्याची साथ कधीही न सोडणारा।
एकांत
नदीकिनारी, थंडगार  निसर्गात हवा हवासा वाटणारा , रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे काळजात घर करणारा ।
एकांत
मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर  अलगत डोलावणारा , खवळलेल्या  समुद्रात त्याच मनाला हेलकावे घ्यायला लावणारा ।
एकांत
आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ पाहणारा , त्याच चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा ।
एकांत
पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर गाण्यासारखा भासणारा , तोच चिवचिवाट, जीवन किती बेसूर आहे याची जाणीव करून देणारा ।
एकांत
येणाऱ्या आयुष्याकडे आशेने पाहायला शिकवणारा , आयुष्यभर होऊन गेलेल्या चुकांचा शोक करत बसणारा ।
एकांत
चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा , तीच रेघ हळूच अश्रूंनी मिटणारा ।
एकांत
निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा , जगणाऱ्याला  आतल्या आत मारणारा ।
एकांत । ।

~सुरेश जांभळकर (चिंटू )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: एकांत!!
« Reply #1 on: March 31, 2014, 12:10:35 PM »
Nice yar   सुरेश (चिंटू)

Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: एकांत!!
« Reply #2 on: March 31, 2014, 12:11:57 PM »
Nice yar   सुरेश (चिंटू)

Offline Suresh Jambhalkar

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: एकांत!!
« Reply #3 on: March 31, 2014, 02:08:26 PM »
 ;) ;) Thanks!!!