Author Topic: सखा सोबती माझा एकटेपणा...!!  (Read 927 times)

सखा सोबती माझा एकटेपणा...!!

हजारोच्या गर्दीत असूनही,

आठवतो हा क्षण पुन्हा.....

पुरता ऐकला पडलोय मी,

सये जाहलो तुजविन सुना.....

असा काही लागला ह्रदयी,

निघता निघेना प्रितीचा रंग जूना.....

शुध्दीत राहूनही बेशुध्द झालो,

बोचू लागल्या असाह्य जखमा मना.....

कुणाला सांगू दुःख माझे,

ऐकवू माझी व्यथा मी कुणा.....

शेवटी ऐकलाच राहीलो मी,

सखा सोबती माझा एकटेपणा.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०९/०४/२०१४...
दुपारी ०१:४८...
©सुरेश सोनावणे.....