Author Topic: गमावलेस तू मला, स्वतःच्या स्वार्था साठी...!!  (Read 1532 times)

गमावलेस तू मला,
स्वतःच्या स्वार्था साठी...!!

ना सुखा साठी,
ना दुःखा साठी,
जोडलेस तू नाते,
फक्त गरजे साठी.....

ना आपल्या साठी,
ना परख्या साठी,
स्विकारलेस तू मला,
स्वतःचे मनभरण्या साठी.....

ना नफ्या साठी,
ना तोट्या साठी,
वापरलेस तू मला,
स्वतःच्या फायद्या साठी.....

ना सोबती साठी,
ना संगती साठी,
उपभोगलेस तू मला,
स्वतःच्या आनंदा साठी.....

ना माझ्या साठी,
ना तुझ्या साठी,
कलंकीत केलेस तू मला,
स्वतःच्या मतलबा साठी.....

ना हास्या साठी,
ना अश्रूं साठी,
गमावलेस तू मला,
स्वतःच्या स्वार्था साठी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १२/०४/२०१४...
सांयकाळी ०८:३८...
©सुरेश सोनावणे.....