Author Topic: एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ...!!  (Read 2586 times)

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ...!!

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
दुःखात असताना ही,
कधी खोटं खोटं हसून बघ.....

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
स्वप्नांच्या जगात हरवताना,
कधी स्वतःला सावरुन बघ.....

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
मनातल्या अबोल भावना,
कधी शब्दात मांडून बघ.....

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
सुखाचे क्षण अनुभवताना,
कधी दुःखाचे ओझे वाहून बघ.....

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
प्रेमाची अपेक्षा ठेवताना,
कधी दुस-यांना प्रेम वाटून बघ.....

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
विरहाचे गीत गाताना,
कधी एकटेपणा सोसून बघ.....

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ,
आपल्यांची आठवण काढताना,
कधी मलाही आठवून बघ......
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १५/०४/२०१४...
दुपारी ०१:५१...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
khalil jast bar nahi vatat ka? ............. tuzya baryach kavita vachalya .... tuzya pretyek kavitet pahile kadve same asate ..... aamatit pani ghatlyavar kashi tichi chav nighun jate tasach ekach line sarkhi sarkhi alyavar vatate. jar tichi kharach garaz asel tar thik ahe pan kavita vadhavayala mhanun just sarkhi sarkhi tich line takne yogya nahi tyamule kavita vachatana maja nighun jate ani pudhchya lines vachayacha hi kantala yeto ... i hope u don't mind my comment :)

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ...!!
दुःखात असताना ही,
कधी खोटं खोटं हसून बघ.....

स्वप्नांच्या जगात हरवताना,
कधी स्वतःला सावरुन बघ.....
मनातल्या अबोल भावना,
कधी शब्दात मांडून बघ.....

सुखाचे क्षण अनुभवताना,
कधी दुःखाचे ओझे वाहून बघ.....
प्रेमाची अपेक्षा ठेवताना,
कधी दुस-यांना प्रेम वाटून बघ.....

विरहाचे गीत गाताना,
कधी एकटेपणा सोसून बघ.....
आपल्यांची आठवण काढताना,
कधी मलाही आठवून बघ......

स्वलिखित -
दिनांक १५/०४/२०१४...
दुपारी ०१:५१...
©सुरेश सोनावणे.....
 
« Last Edit: April 16, 2014, 03:45:31 PM by santoshi.world »

मलाही असेच वाटत Santoshiworld पण कधी कधी भावना अधिक जोमाने दाखवण्याचा प्रयत्न असतो  पण कुठेतरी तो फसला जातो .... पण  पुढे त्या लक्षात येतातच ..
« Last Edit: April 16, 2014, 05:05:56 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Offline vilas khetle

 • Newbie
 • *
 • Posts: 7
छान आहे.