Author Topic: आता कशी येईल, तिला आठवण माझी...!!  (Read 1575 times)

आता कशी येईल,
तिला आठवण माझी...!!

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी एकटं करुन गेली,
स्वतःच्या स्वार्थासाठी.....

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी विसरुन मला,
झाली कुण्या परख्याची.....

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी न समजून घेता,
सोडून गेली मरण्यासाठी.....

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी खोटे नाते जोडून,
भावनांचा खेळ मांडायची.....

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी दुस-याच्या दुःखात,
हर्ष सोहळे साजरे करायची.....

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी प्रवित्र प्रेमाला,
टाईमपासच नाव द्यायची.....

आता कशी येईल,
तिला आठवण माझी,
जी आता झाली आहे,
कुण्या दुस-याची जिवनसाथी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १६/०४/२०१४...
दुपारी ०२:५६...
©सुरेश सोनावणे.....