Author Topic: प्रेमावर माझा विश्वास नाही...!!  (Read 1542 times)

प्रेमावर माझा विश्वास नाही...!!

प्रेमावर माझा विश्वास नाही,

सहवासाची मला आस नाही.....

आयुष्यात कोणी खास नाही,

सुखाचा मला आभास नाही.....

कुणाला तरी समजून घेण्याची,

मला गरज वाटत नाही.....

परखेपणानेच वागा माझ्याशी,

आपुलकीची मला आस नाही.....

संपले केव्हाच आयुष्य माझे,

देहात उरला श्वास नाही.....

पाहीलं आहे या डोळ्यांनी,

तुटणा-या खोट्या स्वप्नांना.....

म्हणुनच आता मी,

कुणाची वाट पाहत नाही.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २६/०४/२०१४...
दुपारी ०५:४६...
©सुरेश सोनावणे.....