Author Topic: मी ईथे तू तिथे...!!  (Read 1317 times)

मी ईथे तू तिथे...!!
« on: May 03, 2014, 09:52:05 PM »
मी ईथे तू तिथे...!!

मी ईथे तू तिथे,
जिवन आहे कुठे.....

तू जिथे मी तिथे,
शब्दही झालेत मुके.....

हल्ली झोप येत नाही,
नकळत स्वप्न ही तुटे.....

सावरण्याच्या प्रयत्नात,
भावनांचा तोल ही सुटे.....

पुरती वेडावले प्रेमात,
अबोल मनाचा चैन ही लुटे.....

तुच आठवतोस फक्त,
नजरे समोर दाटतात धुके.....
:'(  :-(  :'(  :-(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०३/०५/२०१४...
रात्री ०९:२८...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता