Author Topic: जमेल का पुन्हा तुला...!!  (Read 1671 times)

जमेल का पुन्हा तुला...!!
« on: January 11, 2015, 07:33:30 PM »
जमेल का पुन्हा तुला...!!

जमेल का पुन्हा तुला,
माझ्यावर प्रेम करायला,
घरच्यांची नजर चुकवून,
मला चोरुन भेटायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या स्वप्नात रमायला,
गोड आठवणी आठवून,
मला मिठीत घ्यायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या पाऊलखुणा शोधायला,
अनोळखी वाटेत चालताना,
माझा हात हक्काने धरायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या डोळ्यात बुडायला,
माझी शोना शोना म्हणत,
I Love You बोलायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या ह्रदयात रहायला,
जूने वाद-विवाद विसरुन,
तुला माझं व्हायला.....
.♥.  :'(  .♥.  :'(  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ११/०१/२०१५...
सांयकाळी ०७:१७...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


sneha charankar

  • Guest
Re: जमेल का पुन्हा तुला...!!
« Reply #1 on: January 12, 2015, 01:26:29 PM »
wow..mast..khup chhan..:)