Author Topic: ना मैत्री ना प्रेम...!!  (Read 1181 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
ना मैत्री ना प्रेम...!!
« on: July 13, 2015, 05:15:17 AM »
ना मैत्री ना प्रेम, हे कोणत्या नात्यात बांधून गेलास तू...?
गेलास खरा पण, माझं मन मात्र परत द्यायचं विसरून गेलास तू...!
     संपूनही सगळं मागे काही तरी उरते आहे,
     मनाच्या कोंदणात खूप काही सळते आहे...
     अनुत्तरीत सारे प्रश्न, उत्तरांसाठी व्याकुळलेले..
    प्रश्नांच्या या गर्दित मला एकटं सोडून गेलास तू...
ना मैत्री ना प्रेम, हे कोणत्या नात्यात बांधून गेलास तू...?

     प्रेमाची सर ती काही क्षणांसाठीच बरसली होती,
     निरागस त्या प्रेमाची चाहूल मनाला लागली होती...
  देऊन क्षणिक ओलावा, रखरखित उन होऊन गेलास तू...
ना मैत्री ना प्रेम, हे कोणत्या नात्यात बांधून गेलास तू...?

     खुपदा ठरवलं मी, आता तुला विसरून जायचं,
 त्या क्षणांना, त्या स्वप्नांना पुन्हा कधीच नाही आठवायचं,
         पण विसरणं म्हणजे, नेमक काय करायचं,
               ते ही न सांगताच निघून गेलास तू...
 ना मैत्री ना प्रेम, हे कोणत्या नात्यात बांधून गेलास तू...?

          इतका कसा रे मला स्वत:चाच विसर पडावा...
          माझ्या स्वप्नांवर सुद्धा हक्क माझा न राहावा...
          हसू देखिल माझं, तुझ्या स्वाधीन का रे व्हावं...
  जिथे उरले न माझे काही, असे जगणे देऊन गेलास तू...
ना मैत्री ना प्रेम, हे कोणत्या नात्यात बांधून गेलास तू...?
गेलास खरा पण, माझं मन मात्र परत द्यायचं विसरून गेलास तू...!

अर्चना...!!

Marathi Kavita : मराठी कविता