Author Topic: त्याचं विसरणं...!!  (Read 780 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
त्याचं विसरणं...!!
« on: July 16, 2015, 07:12:20 AM »
एखादी गोष्ट विसरण,
त्याच्यासाठी काही नविन नव्हतं..
काल काय झालं,
हे त्याला आज कधीच आठवत नव्हतं...!!

नवलच वाटायचे मला,
त्याच्या या सवयीचे,
निमित्त मलाही मिळायचे,
त्याला थोड छेडण्याचे...!!

त्याचं विसरणं.... माझं,
त्याला आठवण करून देणं,
खुप छान वाटायचं...
थोडं रूसनं - थोडं मनवणं...!!

हट्ट तर त्याचा...
प्रत्येक गोष्टीत असायचा,
मी कितीही नकारल तरी,
मलाही तो हवाहवासा वाटायचा...!!

रूसवे - फुगवे क्षणांचे,
रोजच व्हायचे...
त्या क्षणांनीच तर,
आयुष्य माझे सजायचे...!!

माझ्या वेड्या मनाचे खेळ हे,
त्याला कधीच नाही कळायचे,
त्याचे विसरणे ही मला,
त्याच्या इतकेच आवडायचे..!!

पण काय माहित होत,
एक दिवस तो मलाही विसरून जाईल...!!
त्यालाही आठवतील का हे सारे क्षण...
जेव्हा कधी तो, आयुष्यात मागे वळून पाहील...!!

अर्चना...!!

Marathi Kavita : मराठी कविता