Author Topic: आज काल माझं, असचं काहीसं होत असतं...!!  (Read 1258 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
आज काल माझं, असचं काहीसं होत असतं,
आठवांच्या पावसाने मन रोजच भिजत असतं...
नजरे आड तू, पण मन मात्र तुलाच न्याहाळत असतं...
स्वप्नांचे पंख लावून तुझ्या मागे धावत असतं....
आज काल माझं, असचं काहीसं होत असतं...!!

दूर असूनही तुझं जवळ असणे, छळतय मला..
कळूनही सार तुला न कळणे, सळतय मनाला...
कधी तरी करशिल तुही स्विकार माझ्या प्रेमाचा...
या एकाच विचारात मन क्षणोक्षणी रमत असतं...
आज काल माझं, असचं काहीसं होत असतं..!!

येता जाता प्रत्येक चेहरा तुझाच का रे भासतो...
भासांचा हा खेळ सारा, हवा हवासा वाटतो...
इतरांच्या नकळत तो रोजच चालू असतो...
मन विचारांतच तुझ्याशी वाद घालत बसतं...
आज काल माझं, असचं काहीसं होत असतं..!!

माहीत आहे मला तु पुन्हा कधीच नाही येणार..
तुझी वाट पाहणार्या या वेड्या मनाला
कोण बर समजवणार...
मन मनाच्या ही नकळत,
तुझ्या येण्याची आस लावून बसतं...
आज काल माझं, असचं काहीसं होत असतं..!!
.
.
अर्चना...!