प्रत्येक पावलाच्या चाहुलीत
भास होतो तुझ्या येण्याचा
क्षणभर का होईना, पण...
थबकली दाराशी कोणाची पावले
वाटत -
'तू आलास....'
अधिरतेन उघडते मीही दर..
पण... तिथे तू नसतोस..
असत त्या व्यक्तीच्या नजरेन आश्चर्य
अन माझ्या नजरेत निराशा !!
क्षणभर थांबतेही मी दाराशी
तुझ्या वाटेकडे नजर लावून...
पण तीही आपल्याच नादात
पुढेपुढेच जात राहते
तुला सोबत आणायचं विसरून...
मीही मग दर बंद करते
घरच अन मनाचाही...
उमगलेलं असत मला
तू नाहीस येणार कधी...
मानलेलहि असत मी
आता नाही वाट पहायची...
तरीही....
इतराच्या पदरवात
तुझ्या चाहुलीच वेध घेण...
तसच चालू राहत अव्याहत..
अगदी माझ्याही नकळत....!!!
Honey