Author Topic: घायाळलेलं मन माझे ..!!  (Read 1580 times)

घायाळलेलं मन माझे ..!!
« on: June 06, 2012, 11:41:05 AM »
घायाळलेलं मन माझे ..!!
 
 काही तरी शोधात असतं
 जायचे असतं दूर
 तरी पैलतिरीच थांबत असतं
 जखमा दिल्यास  तू ह्या काळजास माझ्या
 तरी..??
 हे वेडे मन माझे
 तुला तुलाच आठवत असतं
 
 घायाळलेलं मन माझे ..!!
 असेच  काही सांगत असतं
 
 एकटच असतं जमलेल्या  मैफिलीत  ह्या
 अजून हि  तिलाच  शोधत असतं
 विसरलेला गीत तुझे ते
 सतत समोर माझ्या बडबडत  असतं
 
 घायाळलेलं मन माझे ..!!
 - प्रशांत शिंदे
 

Marathi Kavita : मराठी कविता