Author Topic: एक होती सुंदर परी..!!  (Read 1708 times)

एक होती सुंदर परी..!!
« on: June 17, 2012, 10:47:44 AM »
एक होती सुंदर परी
तिला शोना मी म्हणायचो
तिच्या प्रेमात मी पडलो
तिचेच स्वप्न पाहू लागलो

ती सुंदर होती
तिची अदाच होती निराळी

ती हसली की खळी यायची गालांवर तिच्या
मग ती पाहून त्यात डूबायचो
माझी खूप काळजी घ्यायची ती
कधी जेवलो नाही की
दिवसभर ओरडत रहायची ती
खूप मायाळूही होती ती
माझी प्रेयसी होती रे ती

मी हसायचो अश्या वागण्यावर तिच्या
कारण मी खूप प्रेम करायचो तिच्यावर

मग तिचे अन माझे प्रेम लग्नासाठी आतूरले
ती  माझी साजणी बनावी म्हणून सगळेच नाती मी विसरले
ती ही म्हणायची मला तूच साजणा  पाहीजे
आतूर होती ती माझ्या मिठीत जगायला
पण..??
घरचे स्विकारणार नाही सांगून मला दूर ती करत होती

ती म्हणाली विसरून जा रे मला
आपण एक होने शक्य नाही हया जन्माला तरी
पुढचा जन्म माझा मी तूझ्याचसाठी घेणार

तूझ्याचसाठी जगेल मी
तूझीच दासी बनेल

दूर गेली सोडून मला
आता कुठेच दिसत नाही
जाताना बोलली तू दूसरी कुणी बघ
तिला मी समजून तू जग

ठाऊक होतं तिला हे जमणारच नव्हतं मला
आता मला विचारणारेही कुणी राहीले नाही
वाट पाहतो आहे
पण हया जिवनाचा शेवटही होत नाही
तू परत ये मी वाट तूझी पाहील
तुला आठवल्याशिवाय दिवस एक जाणार नाही..
I love u shona..
-
प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता