Author Topic: तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले ..!!  (Read 1830 times)

तुझे माझे बोलणे  काल शेवटचे ठरले
तूझी माझी भेट एक इतिहास बनला होता
तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी
माझ्या हृदयाला आयुष्यभर भिजवणार होते
तू एवढे प्रेम करतेस माझ्यावर
 हे तू बोलूनही दाखवायची
पण ...?
नात्यांच्या जाळ्यांतून का तू सोडवू न पहायचीस..
आज तुझी आणि माझी भेट स्वप्नात हि होत नाही
तुझा विचार करतो
पण समोर तू केलेला अंधार बघ जात नाही ..!!
तुझी माझे बोलणेच फक्त जपून
ठेवलंय
कुणी ऐकू नये म्हणून तयास हृदयातील स्पंदन बनवून ठेवलंय  ..
तुझे माझे बोलणे  काल शेवटचे ठरले ..!!
-
·٠•۞-• ©प्रशांत शिंदे•-۞•٠·"
« Last Edit: June 19, 2012, 01:56:46 PM by प्रशांत दादाराव शिंदे »