Author Topic: कविता आता जवळच्या वाटतात..!!  (Read 1137 times)

आता माझ्या कविता मला खुप रडवतात

कधी तरी हसणारा आज ते ही विसरुन गेलो

हया कविता आता जवळच्या वाटु लागलेत

शब्द  शब्द कंठाऐवजी आता डोळयांतुन येऊ लागलेत

दुसरयांचे अश्रु पुसणारा मी आज माझेच अश्रु बघणारं कुणी राहीले नाही

माझ्याच कविता आता जवळच्या वाटु लागल्यात

तुझी आठवण जे मला करुन देते
तु माझी असल्याचा भास करुन देते

वेडयासारखं का होईना मी ही स्वप्नं पाहतो
सत्यात नसोत पण स्वप्नात मी मिठीत तुझ्या खुप रडतो

मग रात्रही छोटी वाटते

तु निघुन जाते

आयुष्यातुन तर गेलीस तु स्वप्नांतुनही जातेस

माझ्या प्रेम कहाणीचा करुन अंत तु खुश असशील

मी ही खुश रहायचा आता प्रयत्न करतो

जाणीव होते मग मी एकटे पडल्याची
आता तु माझ्यासोबत कधीच नसल्याची

मग....??
पुन्हा एकटाच बसुन मी खुप खुप रडतो

तुला आठवत मी खोटं खोटं जगतो

तेव्हा माझ्याच कविता मलाही जवळच्या वाटतात....
-
प्रशांत शिंदे
« Last Edit: July 23, 2012, 10:06:22 AM by प्रशांत दादाराव शिंदे »