Author Topic: इतका रागावलास!!  (Read 1805 times)

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
इतका रागावलास!!
« on: July 30, 2012, 06:41:06 PM »
इतका रागावलास !
 कि मागे वळून एकदाही पहिले नाहीस !!
 कोंडलेला श्वास, मूक शब्दांचे घास,
 थरथरता आवाज, कोंडलेल्या मनातील गाज!!
 
 इतका रागावलास !
 कि हे काहीही दिसले नाही, ऐकू आले नाही ?
 अश्रूंचा पाउस;
 निराधार धरती, त्यात वणव्याची भरती!!
 
 इतका रागावलास !
 कि जळणारे शरीर, पोळ्णारे मन कधी भासलेच नाही ?
 कोसळलेला वृक्ष;
 दुष्काललेली धरणी, आणि सावरायला मी !!
 
 इतका रागावलास !
 कि जाणीवही झाली नाही, या परिस्थितीची ? 
 निपचित पडलेला तू,
 तुझ्याशी ते अबोल संवाद, मायेने घातलेले वाद!!
 इतकं संपवलास स्वताला,
 कि सर्व जाणीवा निजवून, हा संसार सुपूर्द करून गेलास !!!!   
 :(
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Amolshashi

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
 • BELIVE IN YOURSELF
Re: इतका रागावलास!!
« Reply #1 on: July 30, 2012, 07:21:00 PM »
chan

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: इतका रागावलास!!
« Reply #2 on: July 31, 2012, 10:41:58 AM »
oh.... :(