Author Topic: माझे हे प्रेम तु खोटे नको समजु!!  (Read 2036 times)

माझे हे प्रेम तु खोटे नको समजु
तुटलो आहे मी

मला कमजोर  नको समजू

आता हीम्मत होत नाही
कुणास जवळ करण्याची

पण..??

माझ्या चितेला पाहुन
तुझे डोळे हसतीलच हे नको समजू

मी उद्या नसेल मग आठवण माझी काढशील

माझी माफी मागायला येशील तेव्हा
माझे डोळे बंद बघशील

फोटो नाही बघणार
पण माझी आठवण नक्कीच सजवशील

माझे हे प्रेम तु खोटं नको समजू..!

मी एकटाच गेलो मला हयाचे दु:ख नव्हतेच

फक्त तुझ्या काळजीत माझा देह रडत होते

दु:ख होतं एकच तु माझी झाली नाहीस

तरी मी झोपलो

कारण..??

देवाकडे मागणे मागायचे होते

तुझ्या पदरात माझे आयुष्य टाकुन

तुझे सुख भिक मागायचे होते

मी मेलो आहे माझी तु चिता पेटताना बघणारच

हुंदके देत तेव्हा तु खुप रडणारच

माझ्या चितेवरचे पहीलं फुलही
ते नक्की तुझेच असणारच ...

माझे हे प्रेम तु खोटे नको समजू....!!
-
© प्रशांत शिंदे