Author Topic: तुझी आठवण येते रे ....!!  (Read 2859 times)

तुझी आठवण येते रे ....!!
« on: August 28, 2012, 04:18:16 PM »
येईल अशी एक  वेळ 
 माझ्या प्रेमाची जाणीव  तुला होईल
 मला  भेटण्यासाठी मग
 तूझ्या नजराही आतुर होईल
 म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे  ....!!
 
 आज  वेळ आहे बघ
 वाटेवर  तुझ्या मी उभा आहे
 अश्याच  एक  दिवशी   तू  उभी  राहशील
 पण  उशीर झाला  असेल तेव्हा
 मला तू थीरडी वर पाहशील
 म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे....!!
 
 तेव्हा  तुला जाणीव  होईल
 माझ्या खरया प्रेमाची
 जाणीव  होईल माझ्या एकटे राहण्याची....
 
 मग  तू  माझ्या मागे  येशील ही
 मला हाक  देत तू तेव्हा रडशील ही
 पण  मी गेलो असेल
 माझीही इच्छा  होईल तेव्हा तुला भेटण्याची
 पण ...??
 जीव माझा  कुणाच्या तरी हातात असेल
 
 म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे ....!!
 
 काही  दिवस  जातील मग तुझे लग्न होईल
 खुश  अशील तेव्हा  त्या  तुझ्या संसारात
 पण माझ्या नसण्याची  जाणीव 
 सतत  तुला जाणवेल
 
 म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे....!!
 
 दुसर्याच्या मिठीत असताना
 जेव्हा  तुझ्या  डोळ्यांतले पाणी
 माझ्यासाठी  वाहेल
 तेव्हा  तुला जाणीव  होईल
 माझ्या खरया प्रेमाची
 
 म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे....!!
  -

(¯`v´¯)
 `•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
 ` `... ¸.•°*”˜˜”*°•.
 ...`© प्रशांत शिंदे
 

Marathi Kavita : मराठी कविता