Author Topic: का गेलास!!  (Read 2270 times)

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
का गेलास!!
« on: August 29, 2012, 10:40:34 AM »
का गेलास!!
 स्वप्नांवरती विश्वास ठेऊन
 चालत होते पुढे,
 दिशाहीन झाले जगणे
 उरले फक्त मढे!
 
 नेहेमीच देत होतास वचने
 सुंदर भवितव्याची,
 घेऊन गेलास सगळा काही
 जाणीव न उरली कशाची
 
 अर्ध्यावरती हात सोडूनी
 दूर निघुनी तू जाशी,
 अस्तित्वाची जाणीव होऊन
 प्राण येई कंठाशी!
 
 जायचे होतेच जर सोडून
 तर आयुष्यातच का आलास?
 जीव लावूनी वेड्या माझा,
 जीव घेउनी का गेलास?
 
 एकटीच जगात होते स्वप्नात
 अवचित तू आलास
 अचानक निघून जाताना,
 झोपच उडवून गेलास!
 
 स्वप्नांची तर आशाच संपली,
 जगण्याची तर त्याहून संपली.
 आता निद्रादेवीची आळवणी
 यातच माझी रात्रही संपली.

 :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: का गेलास!!
« Reply #1 on: September 02, 2012, 08:57:57 PM »
 जायचे होतेच जर सोडून
 तर आयुष्यातच का आलास?
 जीव लावूनी वेड्या माझा,
 जीव घेउनी का गेलास?

छान...

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: का गेलास!!
« Reply #2 on: September 07, 2012, 12:17:26 PM »
Dhanyawad