===================================================================================================
आई घराच मांगल्य असते
बाप घराच अस्तित्व असतो
पण घराच्या या अस्तित्वाला
कोणी विचारिताच नसतो
संतांच्या तोंडी आईच असते
देवाला आईचच कौतुक असत
बापाविषई मात्र कधी कुठे
काहीही लिहलेल नसत
आई असते अश्रुंचे पाट
पण बाप सयंमाचा घाट
आई देते रडन्याला वाट
बापावर मात्र तनावाची लाट
आई असते जळनारी ज्योत
पण बाप ज्योतिसाठी समई
ज्योत विझून थंड रहाते
ज्योतिसाठी समई स्वता तापते
रोजच्या जेवणाची सोय करते आई
पण बापाला आयुष्याच्या शिदोरिची घाई
आई रडते बापाला रडता येत नाही
त्याच दुःख त्याच्या शरिराताच राही
स्वताची आई मेली तरी रडायच नाही
कारण बहिणीचा मग तो आधार होई
स्वताचा बाप मेला तरी रडायच नाही
कारण छोट्या भावंडात जिव अडकून राही
कधी अचानक पत्नी पण अर्ध्यावर सोडून जाई
तरीसुधा डोळ्यातून अश्रूंचा थेम्ब नाही
कारण पोटच्या पोराना सांभाळायच असत
अश्रुना आवर घालून सगळ सावरायाच असत
त्याला फ़क्त झिझायच एवढच माहित असत
जबाबदारीच ओझच आता वहायच असत
हो जिजाऊ नीच घडवला युगपुरुष शिवाजी
पण ज्यांची ओढातान झाली ते होते शहाजी
देवकिच अन यशोदेच कौतुक करायलाच हव
पण पुरामधे चाललेल्या वासुदेवाला पण आठवाव
वनवासातिल श्रीराम कौसलेचा पुत्र अवश्य होता
पण पुत्रावियोगान तडफडून मेला तो दशरथ पिता
मुलीला गावुन ,मुलाला लुंगी ,स्वताला मात्र कापड जुन
फटकी बनियान त्याला पडलेली भोक दाढीला नाही साबण
पोरिच लग्न ,पोराच शिक्षण ,दुसर उत्पन्नाच साधन नसत
मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी त्याच पायतान झिझत
सर्वच नसली तरी अहो एखाद बेन अस पण निघत
बापाच्या पैशावर बारमधे जाऊन बापाचीच टिंगल करत
परीक्षेचा निकाल लागला की आई मायेन जवळ घेते
पण गुपचुप जावून पेढ्याचा बॉक्स कोण हो आणते ?
मूल जन्माला आल की मुलाच्या आईच खुप कौतुक होत
पण होस्पिटलच्या बाहेर अस्वस्थ बापाकड़े कोण पाहत ?
चटका बसला ,ठेच लागली की ' आई ग ' शब्द येतो
पण मोठा सप दिसला की बापच का आठवतो ?
अहो छोट्या संकटा साठी आपली आईच आठवणार
पण मोठ्या वादळात आपल्या बापाचीच आठवन येणार !
श्रीमंत मुलीच्या घरी बाप कधितरीच जातो
पण गरीब लेकीकडे उभ्या उभ्या चक्कर मारतो
मुलीच्या स्थळासाठी उम्बरे बापच झिझवतो
मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होतो
सर्वांसाठी सर्व करूनही तो कणखरपणे उभा असतो
पण त्याचा दिवस आता मावळतीकड़े झुकलेला असतो
मग तरुण मुलगा एकदा झिंगून रात्रि उशिरा घरी येतो
आई गाढ़ झोपेत , बाप अस्वस्थ काळजित असतो
पोराची अवस्था बघून बाप धायमोकलून एकटाच रडतो
काय काय केल पोरासाठी तो एकएक आठवू लागतो
गंभीर आवाजात मग लग्नझालेल्या लेकीला फोन लावतो
बापाचा खोल आवाज एका क्षणात लेकिलाच फ़क्त कळतो
कारण बापाच्या इच्छे नुसारच ती बोहल्यावर चढलेली असते
मुलगीच जाणते ,पण मुलानही जानाव हीच अपेक्षा असते
===================================================================================================
===================================================================================================