Author Topic: |!| मला एकटं सोडूनी का गेलीस... |!|  (Read 1226 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
चांदराती सागरी किना-यावर फिरत,
सतत तुझ्या आठवणीत हरवतं...
अन् एकटेपणात माझ्या मनाशी,
तुला विसरायचं कायमच ठरवतं...

पण तुझ्या त्‍या गोड आठवणी,
अजूनही खुप सतवतात मला...
अन् खूप त्रास होतो गं मला,
माझ्या ह्दयातुनी काढताना तुला...

वाटतं का पाहलीस तू मला,
हरवूनी डोळ्यात माझ्या तुला...
जुळणारं नव्‍हतं बंध तुझ्याशी,
तर नियतीने का खेळ खेळला...

वचन दिलीस जाताना मला,
नक्‍की भेटीन पुढच्‍या जन्‍माला...
खांद्यावरती टेकवूनी डोकं तुझ,
माझ्या कुशीत श्‍वास सोडला...

पुन्‍हा एकदा झालो पोरका,
जीवनातूनी साथ तुझा सुटला...
तुझ्याविना क्षणभर जगताना,
माझ्या आसवांना पाझर फुटला...


------------ ------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे
« Last Edit: April 10, 2014, 11:18:08 PM by MK ADMIN »