Author Topic: तुझ्या लग्नात ! (कल्पेश देवरे)  (Read 1552 times)

Offline Kalpesh Deore

  • Jr. Member
  • **
  • Posts: 88
  • Gender: Male

तुझ्या लग्नात !

मी स्वतःला एकटे पहिले
अन डोळ्यात पाणी आले
कधी न विचार केला होता
ते आज येथे गं घडले

खूप स्वप्नं रंगवलेली
त्याची राख रांगोळी झाली
जशी तू मला हवी होती
तशी सजलेली मी पहिली

आज तुझे ते सौंदर्य
माझ्या नशिबामधून गेले
वेळेला असते किती महत्व
ते आज मला गं कळले

आज येथे गं साजणी
मी एक गोष्टं शिकलो
कम नशिबी नाही होणार
जे आज येथे मी झालो 

कवी - कल्पेश देवरे