Author Topic: अजुनही तुझी आठवण येते..!  (Read 2234 times)

Offline gkanse

  • Newbie
  • *
  • Posts: 11
अजुनही तुझी आठवण येते..!
« on: November 21, 2012, 04:08:57 PM »
ये ओळखल का मला..?
छे मी पण वेडाच आहे तू आता कशी ओळखणार मला आतापर्यँत तू विसरलीहि असशील मला..!
 पण मला आजहि आठवतात तुझ्या सोबतचे ते क्षण ते तुझ रुसण, तो तुझा राग
रागात असतांना तर लालबूंद होऊन जायचीस.. तुला समजावतांना मात्र मला धाप लागायची...  मला अजूनही लक्षात आहे ते तुझ माझ्यावर रागावण आणि प्रेमात मात्र खुप लाडावण, कधी ऊशिर झाला मला यायला तर ते बागेतल्या बागेत रूसून बसायचीस.. मि आजही तासनतास बसुन असतो तिथे तु येशील या वेड्या आशेने. 
 मी तुला कस विसरणार हेच आता कळत नाही..
 तु मात्र खुप लवकर विसरलीस मला
तुला आठवत तु दिलेला तो गुलाब अजूनही जपून ठेवलाय मी माझ्या कवितांच्या वहित एकटे पणात तोच असतो माझ्याकडे तुझी आठवण म्हणुन...
 आज काल तर माझा एक नवा मित्र बनला आहे. तोही तुझ्यावर खुप प्रेम करतो तुझी आठवण आली की तोच चालुन येतो डोळ्यातुन... 
चल जावूदे तु कशी आहेस  मी तर वेडाच आहे असाच बडबडत राहणार स्वतःशीच. काय करू माझ्या सोबत आता असच होणार...
तुझि आठवण येणार आणि येतच राहणार... 
   
                  -गौरव कणसे
                 (770939132)

Marathi Kavita : मराठी कविता

hanesh

  • Guest
Re: अजुनही तुझी आठवण येते..!
« Reply #1 on: November 22, 2012, 10:58:20 AM »
Kavita Khupach chan ahe.

Gorakh shinde

  • Guest
Re: अजुनही तुझी आठवण येते..!
« Reply #2 on: November 22, 2012, 01:29:19 PM »