Author Topic: असेच जगतो आहे मी ...!  (Read 1668 times)

असेच जगतो आहे मी ...!
« on: November 22, 2012, 04:26:45 PM »
दु:ख खूप आहेत  आयुष्यात माझ्या
लढता लढता  जगतो  आहे मी
माझे  दु:ख माझ्या  चेहऱ्यावर हि  लपवतो आहे मी
आता  असेच  जगतो आहे मी ...
 खूप प्रेम केलं   तिच्यावर 
पण  तरी  ही   ती  दुसर्याची झाली
तिला  दुसर्याची  पाहून  अंतरात रडतो आहे मी
आता असेच जगतो आहे मी ....!!
 ती  गेली  निघून काहीच कारण  न  देता
नेहमीच भांडायची ती वाटले असेच असेल यंदा
मी  तिला मानवले हि  पण ती हसता हसता  गेली
आता तिच्या आठवणीच  राहिल्यात सोबत
रात्रभर त्यांना आठवत राहतो मी
आता असेच  जगतो आहे मी ......!!
 तिच्यासाठी जगताना स्वतचे अस्तित्व विसरलो मी
आता  तिच्या  आठवणींसोबत
माझे आयुष्य  ही कमी करतो आहे मी
आता असेच जगतो आहे मी ....


आयुष्याचा  शेवट कधी  होईल 
ह्या आशेवर वाट पाहत  आता एकटेच  जगतो आहे मी 
दु:ख माझे  चेहऱ्यावर ही  लपवून 
आता असेच जगतो आहे मी ...!
 -
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

 २२/११/२०१२
 
 

Marathi Kavita : मराठी कविता


Kiran Patil

  • Guest
Re: असेच जगतो आहे मी ...!
« Reply #1 on: January 21, 2013, 02:59:36 PM »
chan