Author Topic: माझे प्रेम अधुरेच राहून गेले ...!  (Read 3741 times)

घाव तूच दिलेस  त्यांवर मलम ही तूच लावलंस

जवळ ही तूच  घेतलंस 

अन.... 

विरह  ही भेट  तुझीच  होती 

चंद्राची कोर तू   चांदणी ही तीच  होती 

माझ्या आयुष्यात  जाताना  मात्र

तू  अमावास्या करून  गेलीस  .........

कसा  साजरे करायचा मी  प्रेम दिवस

माझे  प्रेमच   दवाच्या थेंबासारखे   

हातून  माझ्या  नाहीसे होऊन  गेले .....

नाहीच  आहे प्रेम  नशिबी  माझ्या

प्रेम दिनीही  माझे  प्रेम  अधुरेच राहून  गेले ...
-
© प्रशांत शिंदे
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Prashantji khup hrudaysparshi kavita ahe. Khup chan...

Prashantji khup hrudaysparshi kavita ahe. Khup chan...
धन्यवाद प्राजंकुशजी..