Author Topic: खूप एकटे वाटतंय आज .. !  (Read 1716 times)

खूप एकटे वाटतंय आज .. !
« on: May 22, 2013, 03:02:07 PM »
खूप एकटे वाटतंय आज ..

सारे  काही  घडतंय  विचित्र  आज
सोडून  गेलीस तू हि  त्यात
माझ्या  नशिबाने  मला  आज एकटे पाडले
किती  दुख  झालंय  माझ्या  अंतरात

कसे  मी  सांगू  कुणास
तुझ्यविना  मी  अधुराच  आहे
थरथरतात  हे हात  माझे
नाही  घेणारा कुणी बाहूंत आज ....

खूप एकटे वाटतंय आज ..

किती ग स्वप्न पाहायचे  तुझे मी
नाही  येत बघ  मरण हि आज ....

सारे  काही  घडतंय  विचित्र  आज ....!!

किती  खुश होतो   मी
तुझ्या मिठीत  असताना
आज एकटे  पडलोय सोबत  फक्त  विरहाची साथ ..
न कुणाशी बोलावे वाटतं
न कुणास सांगावे वाटतं
माझे  हे दुख मला किती  टोचतं.....

सोडून जावे  हि मैफिल
अन  अंधारात निघून जावे
झोपलो आहे मी  इथे
चित  कुणी पेटवावे .....
विरहाच्या आगीत  मी  एकट्यानेच    का जळावे..........

खूप एकटे वाटतंय आज .. ....!!
-
© प्रशांत शिंदे
« Last Edit: May 22, 2013, 03:14:25 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
Re: खूप एकटे वाटतंय आज .. !
« Reply #1 on: May 22, 2013, 04:56:28 PM »
nice... :)

संतोष

  • Guest
Re: खूप एकटे वाटतंय आज .. !
« Reply #2 on: May 27, 2013, 09:10:51 AM »
सारे  काही  घडतंय  विचित्र  आज
सोडून  गेलीस तू हि  त्यात

---------------------------

सोडून जाण्यात सुजाणपणा
तिने दाखवला असावा का?
तिने दाखवला असावा का?

शितावरून भाताची तिने
परीक्षा केली असावी का?
परीक्षा केली असावी का?