Author Topic: तुला कळले कसे नाही !  (Read 810 times)

तुला कळले कसे नाही !
« on: July 15, 2013, 11:29:58 AM »
किती प्रेम करतो  तुझ्यावर मी
फुलांसारखे जपत आलो  तुला मी
तुझ्याच साठीच तर आजवर जगात आलो आहे मी ...
तुला कळले कसे नाही  शोना ....


गीत  लिहले आज  तुझ्यावर 
ऐकवण्यासाठी अश्रुंसोबत  आलो आहे मी

का ग  ऐसे  सोडून  जावे तू
देऊनी  शपत  आठवून मला  कधीच  एकटे रडायचे नाही
बंधनात  अडकुनी ऐसे  एकटे
सांग ना  शोना  कसे गं  जगणार मी

तुला कळले कसे नाही शोना ....

मोगरयांचा गजरा  बघ हा
तुझ्यासाठी आज घेउनि आलो आहे मी
म्हणायची ना तूच 
हा  सुगंध म्हणजे  प्रेम आपले
असेच  सोबत ठेवायचे आहे मला
फुल हे  सारेच  सोबत तुझ्या आज घेऊन जाते आहेस  तू .......

तुला कळले कसे नाही शोना ....

का  एकटे सोडून  मला
आयुष्य  हे जगायचे वचन  घेतले आहेस तू ....

अधुरा गं  मी तुझ्याविना   
ठाऊक नाही  हे वचन ही  उद्या 
दृदय माझे पाळेल कि नाही  ....

सांग ना सये तुला
दुख माझे हे कळले का नाही....
-
• ©प्रशांत. डी .  शिंदे•

Marathi Kavita : मराठी कविता