Author Topic: माझेच चुकले सारे!  (Read 1542 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
माझेच चुकले सारे!
« on: March 20, 2014, 11:56:35 AM »

तू दिलेस भर-भरून, पण मी नाही घेतले हे,
माझेच चुकले सारे, पण मी नाही साहिले हे,

"घेऊन जा मला तू" जरी बोललीस तू हे,
"आव्हान" तुझे ते मज नाही पेलवले हे,

देऊन टाकले तू जरी सर्व काही,
जणू दान सर्स्वाचे हे, देऊन टाकले हे,

दिलास तू खजाना-दिल खुलासपणे तू,
पण नाही सरसावलो, मन नाही धजावले हे,

"प्रीतीचे" भांडार तू जरी दिले लुटावयाला,
माझेच चुकले सारे! चोरी करावयाला,

"सावज" हाताचे गेले निघोनी मी राहिलो निराहारी,
माझेच चुकले सारे! शिकार करावयाचे हे,

श्री प्रकाश साळवी दि. २१ मार्च २०१४ स. ११.४०
[/b]

Marathi Kavita : मराठी कविता