Author Topic: का बोलत नाहीस...तु...!  (Read 2289 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
का बोलत नाहीस...तु...!
« on: April 29, 2014, 12:20:18 PM »

---------------- ----------------
एक काळ होता पावसाचा,
हा निसर्ग रम्यमय व्हायचा...
अन् त्या चिबं श्रावण सरीत,
देह आमुचे भिजून जायचा...

त्या धुदं श्रावण सरीत,
पक्षी पाखरे बागडू लागायचे...
अन् हिरवी शाल पाघंरुन,
आम्ही दरीत शोभून दिसायचो...

एकेकाळी अचानक माझ्या मला,
ती वाहत वाहत  येवूनी भेटली...
अन् तिच्या पाणेरी डोळ्यात,
पाहताच क्षणी मनात आग पेटली....

आता आमचं रोजचं चालायचं,
ती मला रोज येवून भेटायची...
अन् तिच्या लाटाना उसळून ,
अंगावर जोराने शिडकावयाची..

पण नियतीला हा खेळ मंजुर नव्हता,
तिच्या ओहोटीचा माझ्यावर कोप झाला...
अन बघता बघता काय झालं की,
आमच्या वाटा दुभागत गेल्या...

पण आता ती खुप बदलली,
पहिल्या सारखं नाही बोलायची...
आता माझ्या समोरुन वाहायची पण,
दुसर् या पर्वताला जाऊन भेटायची...


---------------- ----------------
©स्वप्नील चटगे
[दि29-04-2014]
---------------- ----------------
« Last Edit: May 01, 2014, 11:19:04 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


vilas khandvi

  • Guest
Re: का बोलत नाहीस...तु...!
« Reply #1 on: May 05, 2014, 10:38:56 PM »
i lake him.