Author Topic: पाऊस तेव्हा, पाऊस आता!  (Read 1742 times)

Offline abhi manchekar

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
पाऊस तेव्हा, पाऊस आता!
« on: June 22, 2014, 02:08:04 AM »
तुझ्या गावचा पाऊस तेव्हा अवखळ होता,
मातीमध्ये तुझा अनोखा दरवळ होता,
उरला नाही तसा पाऊस, तशी माती;
नुसती आहे नभी ढगांची तळमळ आता.

तेव्हा पाऊस होता मनभर विसावलेला,
आता पाऊस आहे वनभर पिसाटलेला.

तेव्हा पाऊस अलगद होता,
आता पाऊस अवजड आहे.
तेव्हा पाऊस होता सोपा,
आता पाऊस अवघड आहे.

तेव्हा राणी तुझ्या सरीनी पाऊस होता सजलेला,
आता असतो पाऊस वेडा स्वतःमध्येच भिजलेला.

अभिजीत.   

Marathi Kavita : मराठी कविता


umesh kumbhar

  • Guest
Re: पाऊस तेव्हा, पाऊस आता!
« Reply #1 on: July 10, 2014, 10:02:58 AM »
kavita chhaan ahe

Offline abhi manchekar

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
Re: पाऊस तेव्हा, पाऊस आता!
« Reply #2 on: August 18, 2014, 07:06:37 PM »
Thanks......