Author Topic: फक्त तुझ्याच आठवणीत.....!  (Read 1463 times)

Offline yoga pawar

  • Newbie
  • *
  • Posts: 2
फक्त तुझ्याच आठवणीत.....!
« on: September 16, 2014, 10:51:26 AM »
फ़क्त तूझ्याच आठवणीत.......!

खुप सतावलस या प्रेमात..
एकदा तरी येउन जा...
व्याकुळलेल्या वेड्या मनाला,
थोडस प्रेम तरी देऊन जा......!

या डोळ्यानी फ़क्त तुझाच चेहरा दिसेल अशी,
नजरेला नजर तू भिडवून जा....
पाणावलेल्या डोळ्यांना या,
गोड स्वप्ने तू देऊन जा.......!

मनी तुझेच शब्द रहातील,
अशे गोड शब्द तु बोलून जा.......
भेटली होतीस पहिल्या वेळी जशी,
तशीच पुन्हा एकदा तरी भेटून जा....

ह्रुदयात तुझच नाव राहिल,
इतक वेड तू करून जा...
हरवलेल्या या वेड्या प्रेमाला...
जगण्याचा रस्ता तू दाखवून जा....!

आयुष्यभर फ़क्त तूझाच राहीन...
वचन माझे तू घेउन जा.....
तूझ्याच आठवणीत डोळे बंद करण्यापूर्वी.....
एकदा तरी मला बघून जा...
एकदा तरी मला बघून जा.....!

                     - योगेश पवार...!

Marathi Kavita : मराठी कविता