Author Topic: ...लावून हात तू राखेला!  (Read 994 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
...लावून हात तू राखेला!
« on: September 20, 2014, 11:06:35 AM »
राखलीस लाज माझी
लावून हात तू राखेला
संसारासाठी तुझ्या
कवटाळले मी मृत्युला!

पसरुनि पदर प्रिये
याचना तू केली
झिडकारुन प्रेमाला
सासरी निघुन गेली!

कळला आज मला
अर्थ ख-या प्रेमाचा
प्रेमानेच घेतला रे
बळी आज प्रेमाचा!

जळतील लाकडे चितेची
उरेल नुसती राख
राखेतुनही हाकारतील तुला
तुकडे जीवाचे लाख!

भिजेल राख माझी
आसवे नकोस गाळू
अस्थिलाही माझ्या
नकोस तू कवटाळू!

आलीस धावत पळत
दाबुन त्या हुंदक्याला
केलेस अमर तू
माझ्या त्यागी प्रेमाला!

मिळेल मुक्ती आता
माझ्या या जीवाला
राखलीस लाज माझी
लावून हात तू राखेला!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता