Author Topic: दगडाला जीव लावला!  (Read 1195 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
दगडाला जीव लावला!
« on: September 21, 2014, 08:08:37 PM »
लोक जीवाला जीव लावतात
मी दगडाला जीव लावला
माहीत नव्हते मला
दगडाला काळीज नसते ते....
किती जखमा झाल्या काळजाला,
माझेच मला कळले नाही
तरीही,
राहिले कवटाळत त्यालाच..
अन्
तो माञ
शोषत राहिला माझे रक्त!
आज  झाले मी घायाळ
तुटले ह्रदय माझे
तळमळतेय मी ....
अन् तो माञ,
कुणाचं काही नसल्यासारखा
जावुन बसलाय ...देव्हा-यावर-
पुन्हा शेंदुर फासुन घ्यायला!

अरे दगडा ....
तुझं विसर्जन मीच करणार आहे-
अन् तेव्हा,
तुझेच विखुरलेले तुकडे
तुलाच ओरबाडत असतील!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता