Author Topic: अश्रूंची भेट देवून गेली!  (Read 1070 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
राहुन गेली मनातच ती
जी आज दूर गेली
सहवास सोडुनि माझा
आठवणी ठेवुन गेली !

झाली भेट नजरेची जेव्हा
हास्याची सोबत देवून गेली
नजर झुकवून आज ती
अश्रुंची भेट देवून गेली !

शिरुन काळजात अजाणता
प्रेमाची शपथ ती देवून गेली
लहरीपणाचा कळस करून
तीच आज शपथ तोडून गेली!

भरकटलेल्या माझ्या नौकेला
किनारा ती दाखवून गेली
अथांग सागरात नैराश्याच्या
तीच पुन्हा ढकलून गेली!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):