Author Topic: ...झाली ती परकी!  (Read 1369 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
...झाली ती परकी!
« on: November 07, 2014, 10:07:47 PM »
राहिले दूर घर माझे,जिथे मला जायचे होते
गेले सोडुन ते ह्रदय,जिथे मला रहायचे होते!

सरावले ह्रदय तिच्या सहवासाला बेमालुम
आता कुणाला त्याने आपले मानायचे होते!

प्रेमाची शीव लग्नाच्या शीवेला लागुन असते
लुटून मला,सीमोलंघन तिला करायचे होते!

बुडत गेलो आकंठ प्रेमात तिच्या मी वेडा असा
तिला तिच्या ह्रदयाच्या खोलीला मोजायचे होते!

का खेळली ती हा खेळ माझ्याशी कळले आता
कसे असते प्रेम गुलाबी,तिला शिकायचे होते!

अनुभवाची बांधून शिदोरी झाली ती परकी
रिता मी अन् रंग स्वप्नात तिला भरायचे होते!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता