Author Topic: मन तुलाच शोधूनी पाहे ..!  (Read 1114 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
मन तुलाच शोधूनी पाहे ..!
« on: December 23, 2014, 07:33:47 AM »
मन तुलाच शोधूनी पाहे !

तुज ठाऊक आहे , हे शब्द आजही … तुझ्याच अवधी आहे .,
आज भिरभिरणारी नजर हि , मन तुलाच शोधूनी पाहे !

१)
नकळत जुळले ऋणानुबंध हे , नकळत जुळली नाती .,
भेद जरी असले मनी , तरी हा हात तुझ्याच हाती .,

खरच का ग इतके अवघड असते , आठवणीत गुणगुणणे .,
पावसाचे ते फक्त भिजून आपले , तुझ्यातच मी रमने .,

एकट चालताना देखील हि , तू असल्याचा भास होतो .,
नाहीच जरी तू जवळी माझ्या , तरी तिथे तुलाच मी शोधतो .,

रडताना हि ते ओलसर डोळे , आठवण तुझीच देतात .,
थांबते तितक्यात डोळ्यातील पाणी , मज साठवण मनात रुजतात .,

ओघळणाऱ्या गालांवरती , हात तुझाच स्पर्शावतो .,
मनातल्या यातना गुंफण्या , मी आठवण तुझीच काढतो .,

नाही जरी तू माझी " मी " तरी , मी तुझाच " तू " आहे  .,
गेलीस सोडून दूर देखील हि , मन तुलाच शोधूनी पाहे !

२)

ऐकण्या तुज मी अतुरलेलो , तुझे भाव ओंजाळून घेतो .,
इतक्यात येणारी हक तुझीही ., मी स्वतास विसरून जातो .,

अलगद उमलत पावले मातीवर , ती हि मी साठवली .,
गेली वाहून भरतीने  मातीही ., खोऱ्याने सागरातून काढली .,

तूच " तू " आहेस कवितेत माझ्या ; तूच तू राहशील सर्वदा ,
तुझ्याच तू ला प्रश्न असा कि , खरच आजही आहे का " मी " तुझा ??

शब्दांच्या या खेळ मध्ये ., बघ किती जीव तळमळत आहे ,
गेलीस सोडून दूर देखील हि , मन तुलाच शोधूनी पाहे !


अक्षय भळगट

Marathi Kavita : मराठी कविता


saddy

  • Guest
Re: मन तुलाच शोधूनी पाहे ..!
« Reply #1 on: December 23, 2014, 05:52:16 PM »
khup sundar kavita....
bhavna khup sundar ritine mandly ahet