Author Topic: खबरदार...! जर करशील बलात्कार  (Read 845 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खबरदार . . . ! खबरदार . . . !
करशील पुन्हा बलात्कार
घेऊन हातामंधी तलवार
करीन तुकडे तुझे हजार
खबरदार. . . ! खबरदार. . . ! !

आली मेलेल्याला जाग
पेटली छातीमंधी आग
होईल क्षणात तुझी राख
आता माणसासारख वाग
नाहीतर . . . .
खबरदार. . . ! खबरदार. . . !!1!!

पुन्हा तिच्या अब्रुसी खेळणार
तुझ्या छाताडावर बसणार
तू कोण ते ना बघणार
तुला जागीच संपवणार
जाऊन तिला माफी मांग
नाहीतर . . . . .
खबरदार. . . ! खबरदार. . . !!2!!

असेल मोठा तुझा बाप
जरी तू जहरीला साप
नाही करणार तुला माफ
चोपुन करीन तुला साफ
मूंगुस बनून तुकडे तुझे करणार
खबरदार. . . खबरदार. . . !!3!!

पाहून गरीब दिन दुबळा
जर ठेवशील अब्रुवर डोळा
घाल तुझ्या क्रूरपणावर आळा
बंद कर आता ह्या खेळा
नाहीतर, जिवंत तुला गाड़णार
खबरदार. . . !खबरदार. . . !
 करशील पुन्हा बलात्कार
घेऊन हातामंधी तलवार
करीन तुकडे तुझे हजार
खबरदार. . . ! खबरदार. . . !!4!!


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


मकरंद

  • Guest
खबरदार . . . ! खबरदार . . . !
करशील पुन्हा बलात्कार
घेऊन हातामंधी तलवार
करीन तुकडे तुझे हजार
खबरदार. . . ! खबरदार. . . ! !

अरे बाप रे, न करे  मी
पुन्हा कधी, कधीही बलात्कार

रमेश

  • Guest
चोरबाजारात न गंजलेल्या तलवारी स्वस्त दरात मिळतात.