Author Topic: आज पुन्हा तुझ्या आठवांशी भांडण माझे झाले....!  (Read 2622 times)

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
    आज पुन्हा तुझ्या आठवांशी भांडण माझे झाले...!

      ते क्षण तुझे माझे पुन्हा डोळ्यांत उतरले...
कधी माझ्या मनाला कधी तुझ्या आठवांना मी समजावले...
      नका रे आठवू आता... ते प्रेम नाही उरले...

   आज पुन्हा तुझ्या आठवांशी भांडण माझे झाले...!

     का नाही थांबलास... जेव्हा मी तुला आडवले...
        होते ना प्रेम... मग कसे रे तुला विसरवले...
          कोण जाणे कसे... क्षणात सारे बदलले...

    आज पुन्हा तुझ्या आठवांशी भांडण माझे झाले....!

     शब्दांचा हा खेळ सारा.. तुझ्यामुळेच जमतो आहे...
नाहीस तू जवळ... म्हणूनच शब्दांचा आधार मिळतो आहे...
     तू मला दूरावलेस ... पण शब्दांनी आपले केले...

     आज पुन्हा तुझ्या आठवांशी भांडण माझे झाले...!

      आस तुझ्या येण्याची... आता कुठे उतरलीच नाही...
         प्रित माझी वेडी... तुला कधी कळलीच नाही...
         मिटले क्षणभर डोळे.... मन गहीवरून आले...

     आज पुन्हा तुझ्या आठवांशी भांडण माझे झाले...!


Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
ag mla vatat tu majhya manatl olkhun lihtes re.......
mastch.........

Archana..!

 • Guest
Hmmmm...

मला वाटतं...प्रत्येकाची love story वेगळी असली तरी feelings सारख्याच असतात....

त्यामुळे कदाचित तुला तसं वाटतयं.....

Offline abhi manchekar

 • Newbie
 • *
 • Posts: 13
 • Gender: Male

kavita naidu

 • Guest
Verry nice aa...mala karach koop koop avadle ek ek sabdh...nice one dear

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Thank you so much...
खूप छान वाटतं तुम्हां सगळ्यांचे reply वाचून..!

Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 146
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...

Rahul deshpande

 • Guest
khuppppp sundar, shabdana chan gunflay kavitechya dhagyat...!!!!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):