Author Topic: आठवणींची फुले...!  (Read 2181 times)

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
आठवणींची फुले...!
« on: June 10, 2015, 03:23:21 PM »
अल्लड मी... अवखळ मी...होते स्वत:च्याच धुंदीत मी...
ज्याची नव्हती जाण मला...
अशा प्रेमाच्या जगात घेऊन गेलास तू...
आठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...!

गंध त्या फुलांचा आता नेहमीच दरवळत असतो...
सगळं असतं सोबत, तू कुठेच नसतोस...
नकळतच पण माझा श्वास होऊन गेलास तू...
आठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...!

पायवाट ती नेहमीची चालत असते मी एकटीच...
साथ असते माझ्या सावलीची... तीही सूर्य मावळण्या पुरतीच...
भास तुझ्या सहवासाचे मला देऊन गेलास तू...
आठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...!

गुपित या नात्याचे न कळू दिले मी कुणास...
जपून ठेवलयं ते प्रेम, माझ्या मनाच्या कोंदणात...
कधीही न उलगडणारे एक रहस्य होऊन गेलास तू...
आठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...!

डोळ्यांतून बरसणारा आसवांचा पाऊस... कशी मी आवरू...
दूरावतो आहेस तू प्रत्येक क्षणाला...
सांग ना, त्या क्षणांना कशी मी सावरू...
एकांतात ओघळणारा अश्रू होऊन गेलास तू...
आठवणींची फुले माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...!

चंद्र तो नभीचा, कधी भेटतो जेव्हा मला...
येते का रे त्याला आठवण माझी, की विसरला, विचारते मी त्याला...
अनुत्तरीत चंद्रही, जणू त्यालाही तुझ्यात सामिल करून गेलास तू...
आठवणींची फुले ओंजळीत माझ्या देऊन गेलास तू...!

स्वप्नांच्या जगात रमणारी मी... स्वप्नातच जगणारी मी...
परीकथेतील राजकुमाराची स्वप्न पाहणारी मी...
स्वप्नातील त्या राजकुमाराचा चेहरा होऊन गेलास तू...
आठवणींची फुले मात्र माझ्या ओंजळीत देऊन गेलास तू...!


अर्चना...!

Marathi Kavita : मराठी कविता


lakshmiG

 • Guest
Re: आठवणींची फुले...!
« Reply #1 on: June 12, 2015, 01:18:38 AM »
khup sundar archana ji!!!   :)  :( :-X

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: आठवणींची फुले...!
« Reply #2 on: June 12, 2015, 11:31:37 AM »
Thank You!
Pan mala Archanaji... naka mhanu, mi kay evdhi mothi nahiye.... :P

Offline महेश रा. केसरकर

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
Re: आठवणींची फुले...!
« Reply #3 on: June 12, 2015, 10:46:02 PM »
Very nice archu.. :P

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: आठवणींची फुले...!
« Reply #4 on: June 13, 2015, 06:27:43 AM »
Thank you sir.. 😃

Offline महेश रा. केसरकर

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
Re: आठवणींची फुले...!
« Reply #5 on: June 13, 2015, 09:38:52 PM »
Sir ???
Mi pan evdha motha nahiye.. :D :P

Rajeshreekamble

 • Guest
Re: आठवणींची फुले...!
« Reply #6 on: June 17, 2015, 03:54:09 PM »
Khup chan Archana.. Hi kavita vachtana vatat hot ke je mala bolaych ahe tech me vachat ahe... manatlya bhavnana chan shabdat utravla ahes... khuup chaan... me ashach fulana japun thevlay.. I strongly relate to this..

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: आठवणींची फुले...!
« Reply #7 on: June 17, 2015, 03:56:01 PM »
Thank you...Rajeshree..!  :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आठवणींची फुले...!
« Reply #8 on: June 24, 2015, 04:37:29 PM »
कधीही न उलगडणारे एक रहस्य होऊन गेलास तू...

क्या बात .....अर्चनाजी मस्तच ..... :)

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: आठवणींची फुले...!
« Reply #9 on: June 24, 2015, 04:54:55 PM »
Thank You.. :)