Author Topic: का तरीही ..!  (Read 1377 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
का तरीही ..!
« on: August 16, 2015, 07:19:19 AM »
कोमजले आहे सारे आता माहित असूनही ;
का मी पुन्हा फुलामध्ये गंध शोधतो आहे !

लावूनी पंख फुलपाखराचे इवलसे जरासे ;
का मी पुन्हा तुझेच पाऊलखूणा शोधतो आहे !

विरले आहे सारे आता माहित असूनही ;
का मी पुन्हा पापण्यात स्वप्न रंगवित आहे !

घेवूनी थोडे रंग उसणे नभातले इंद्रधनूकडून ;
का मी पुन्हा स्वप्नात तुलाच रंगवित आहे !

गुरफटले आहे आता सारे माहित असूनही ;
का मी पुन्हा ओठावर तुझे नाव गुणगुणतो आहे !

अडखळलेले शब्द सारे अबोल ओठातले फुलवून ;
का मी पुन्हा काव्याचा लाटावरुन उधळीत आहे !

...... स्वप्नील (अबोल मी )

Marathi Kavita : मराठी कविता