अनेक वेळा अहंकारामुळे चुकांना आपणच जवाबदार असतो आणि, जेव्हा माफी मागण्याची वेळ येते तेव्हा
माफीचा साक्षीदारही मिळणं कठीण होऊन जात. वेळीच माफी मागाल तर हरवलेलं प्रेमसुद्धा परत मिळवता येईल.
तुझ्यावर केलेल्या खोट्या आरोपाचा
तुझी क्षमा मागण्यासाठी वाट पाहत होतो
तु नव्हतीस तेव्हा !
तुझ्यावरच प्रेम हरवून बसल्यावर
पश्चातापाच्या आगीत जळत होतो
तु नव्हतीस तेव्हा !
तु माझ्यासाठी प्रेरणा होतीस
हे तुला सांगण्यासाठी वण वण भटकत होतो
तु नव्हतीस तेव्हा !
तुझ्यावरचा अधिकार गमावून बसल्यावर
स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करत होतो
तु नव्हतीस तेव्हा !
अपयशाच्या खांद्यावर डोकं ठेऊन
मनाला कठोर करण्याचा प्रयत्न करत होतो
तु नव्हतीस तेव्हा !
तु येशील जेव्हा पुन्हा
कदाचित मी नसेन तेव्हा !
सुनिल(रुद्र ) संध्या कांबळी.
snl_1408@yahoo.com